पालघर नगरपरिषदेत विकासकामांचा धडाका

पालघर नगरपरिषदेत विकासकामांचा धडाका

Published on

पालघर नगर परिषदेत विकासकामांचा धडाका
पालघर, ता. ९ ः नगर परिषदेत नगराध्यक्ष, विविध समिती, नगरसेवकांची कार्यकारिणी बसल्यानंतर शहरातील प्रलंबित विकासकामांच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली आहे. सोमवारी नगर परिषदेच्या कार्यकारिणीने एकत्रित येत अल्याळी परिसरातील आठ विकासकामांचे भूमिपूजन केले.
अल्याळी नवापाडा तलाव सुशोभीकरण, भरवाडपाडा समाजमंदिर, नवापाडा व्यायामशाळा बांधणी, विपश्यना केंद्रामागील गटार बांधणे, बसथांब्यापर्यंत गटार बांधणे, एकनाथ भोईर यांच्या घरापर्यंत गटार बांधणे, ब्रह्मनगर भैय्यापाडा येथे अंतर्गत गटार बांधणे, हनुमान मंदिर परिसरात समाजमंदिर बांधणे, अशा विविध कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर वडे, आरोग्य सभापती अमोल पाटील, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी गटनेते भावानंद संखे, डॉ. उज्ज्वला काळे, राहुल पाटील, स्थानिक नगरसेवक धर्मेंद्र भट, आरिफ कलाडिया, जस्विन घरत, राधा मानकामे पामाळे, मेघा आघाव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com