शहापूरचा पॅर्टन जिल्ह्यात राबविणार

शहापूरचा पॅर्टन जिल्ह्यात राबविणार

Published on

शहापूरचा पॅर्टन जिल्ह्यात राबविणार
- शिक्षकांना मस्टर ट्रेनर म्हणून पाठविणार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे जिल्ह्यातील अतिदुगर्म व आदिवासीबहुल तालुका म्हणून शहापूरकडे पहिले जाते. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक नावीन्य पूर्णयुक्ती वापरत येथील विद्यार्थ्यांना अज्ञापनाचे धडे देत असतात. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेत वाढ होवून, स्कॉलरशीपमध्ये घवघवीत यश मिळवीत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांचादेखील स्कॉलरशीपचा निकाल वाढवा यासाठी, शहापूर तालुक्याचा पॅटर्न जिल्ह्यातील इतर तालुक्यात राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजन करण्यात येत आहे. तसेच खासगी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी अनेक शाळांमध्ये इंग्रजीचे धडेदेखील मराठी विषयासह प्रभावीपणे देण्यात येत आहेत. अशातच शहापूर तालुक्यातील शिक्षकांकडून देण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेव वाढ होऊन स्कॉलरशीप स्पर्धेत अव्वल ठरत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचे धडे इतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील मिळावे, यासाठी शिक्षण विभाग सरसावला आहे.
--------------
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील शिक्षक हे मस्टर ट्रेनर म्हणून जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे. स्कॉलरशीप स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी त्यांच्याकडून सात ते दहा महिने आधी म्हणजेच ४ थी आणि ७ वीच्या स्कॉलरशीप स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असते. इयत्ता ३ री आणि ६ वी पासूनच प्रशिक्षण देण्यात येत असते. त्यानुसार याचे मार्गदर्शन मस्टर ट्रेनर शिक्षकांना देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com