माणगाव पंचायत समितीवर  शिवसेनेचा भगवा फडकला

माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला

Published on

माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला
जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी दोन जागा
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी प्रत्येकी २-२ जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे. मात्र, पंचायत समितीच्या आठ पैकी पाच जागांवर विजय मिळवत शिवसेनेने माणगाव पंचायत समितीवर आपला भगवा दिमाखात फडकवला आहे.
माणगाव येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या दोन जागा व पंचायत समितीच्या पाच जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यावर माणगाव तहसील कार्यालय येथील मैदानात शिवसैनिकांनी घोषणाबाजी व गुलालाची उधळण करीत जयघोष केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मोर्बा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून आणि तळाशेत जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व साई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.

फोटो ओळ -
माणगाव ः येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com