महापालिका इमारतींमध्ये सूचना पेटी बसवण्याची मागणी
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : सार्वजनिक कारभारातील नागरिकांचा थेट सहभाग वाढावा, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक वास्तूंमध्ये तक्रार व सूचनापेट्या बसवण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. नव्याने निवडून आलेल्या महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांना सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गायकवाड यांनी सोमवारी (ता. ९) लेखी निवेदन दिले.
नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असून ही ओळख कायम राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. करदाते नागरिक त्यांच्या अडचणी, विकासकामांबाबतच्या सूचना, तसेच सुशोभीकरणाशी संबंधित अभिप्राय थेट प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतील, या उद्देशाने महापालिका शाळा, नागरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालये, बस स्थानके, बस डेपो, विभागीय कार्यालये, सामाजिक सभागृहे व उद्यानांच्या दर्शनी भागात तक्रार व सूचनापेट्या बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. या पेट्यांमधील निवेदने आठवड्यातून एकदा उघडून त्यावर योग्य कार्यवाही करावी व संबंधित अर्जदारास लेखी कळवावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

