पेन्शनधारकांचे बुधवारी घंटानाद आंदोलन

पेन्शनधारकांचे बुधवारी घंटानाद आंदोलन

Published on

पालघर, ता. ९ (बातमीदार)ः केंद्राच्या अर्थसंकल्पात पदरी काहीच पडले नसल्याने पेन्शनधारक हताश झाले आहेत. याच अनुषंगाने विद्यमान खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या वाडा येथील कार्यालयासमोर बुधवारी घंटानाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भोपाळ येथे झालेल्या दिशादर्शक बैठकीत यावर्षी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील ऐंशी लाख पेन्शनर एक हजार ते साडेतीन हजार इतक्या अल्प पेन्शनवर उदरनिर्वाह करत आहेत. पस्तीस लाख पेन्शनधारकांना एक हजारपेक्षा कमी पेन्शन मिळते. सत्तेवर येण्याआधी कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार किमान तीन हजार पेन्शन अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, गेली अकरा वर्षे या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com