अलिबागमध्ये शेकापला मोठा धक्का
अलिबागमध्ये शेकापला मोठा धक्का
शिवसेनेची मुसंडी; सातपैकी ६ जागांवर विजय; एक जागा राष्ट्रवादीकडे
अलिबाग, ता. ९ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निकालात एकेकाळी एकहाती वर्चस्व असणाऱ्या अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. अलिबाग तालुक्यात शेकापला एकही जिल्हा परिषदेची जागा जिंकता आलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने तालुक्यात चांगलीच मुसंडी मारून सातपैकी सहा जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
निवडणुकीत महायुती म्हणून सत्तेत असणारे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट व भाजप हे एकमेकांविरोधात उभे होते. तर शेकाप, ठाकरे गट व काॅंग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपला करीष्मा दाखवित अलिबामधील सातपैकी ६ जागांवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर गटात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांचा ४,५१५ मतांनी विजय, आवास गटातून माजी सभापती दिलीप भोईर यांचा २,३७२ मतांनी विजय, चैल गटात सचिन राउळ यांचा ३७६७ मतांनी विजय, काविर गटात ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी यांचा १५४ मतांनी विजय झाला. तर तालुक्यातील एकमेव शहापूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अमित नाईक यांचा ३०२४ मतांनी विजय झाला.
शेकापमध्ये निराशा
अलिबाग तालुका एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, शेकापमधील दिग्गज नेते असणारे दिलीप भोईर, धैर्यशिल पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर शेकापला जिल्ह्यात काहीशी उतरती कळा लागल्याचे बोलले जात आहे. गेली अनेक वर्षे शेकापने रायगड जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र आता झालेल्या निवडणुकीत शेकापचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची निराशा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

