पेझारी ते हेमनगर शिवसेनेचा विजयोत्सव
पेझारी ते हेमनगर शिवसेनेचा विजयोत्सव
पोयनाड, ता. ९ (बातमीदार) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अलिबाग तालुक्यात आणि त्यातही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेने भगवा फडकावला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा विजयोत्सव साजरा केला आहे.
शेकापचे वर्चस्व असलेल्या या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या रसिक केणी या साडेचार हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. तर आंबेपूर पंचायत समिती गणात शिवसेनेचे शैलेंद्र पाटील हे १००८ मतांच्या फरकाने तर रुईशेत भोमोली या पंचायत समिती गणातून शिवसेनेचे कृष्णा लोभी हे ४३१७ मतांनी विजयी झाले आहेत. या सर्वांचा आनंद म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पेझारी चेकपोस्ट ते हेमनगर अशा विजयोत्सव रॅलीचे आयोजन केले होते. पेझारी, बांधण नाका, नवेनगर फाटा, श्रीगाव, मेढेखार, कातळपाडा, कुसुंबळे, हेमनगर अशा या विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. ठिकठिकाणी शिवसेनेच्या या विजयोत्सव रॅलीचे स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांनी या विजयाबद्दल नाचत एकच जल्लोष केला.तसेच प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. या विजयानिमित्त पोयनाड विभागातील समाजमाध्यमांवर शिवसेनेचे अभिनंदन करणारे ए भावा आपलीच हवा, आवाज कोणाचा शिवसेनेचा असे संदेश दिसून आले आहेत. आंबेपूर मतदारसंघातील शिवसेनेच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल नागरिकांनी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

