सायबर चोरट्यांच्या जाळ्यात पोलिस

सायबर चोरट्यांच्या जाळ्यात पोलिस

Published on

पनवेल, ता. १० (वार्ताहर) : डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता थेट पोलिसांनाही आपले लक्ष्य बनवू लागले आहे. एका सायबर गुन्हेगाराने नवी मुंबईतील एका पोलिसाला डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने १९ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

३४ वर्षीय पोलिस शिपाई कळंबोलीत राहण्यास असून तो नवी मुंबई पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. १ डिसेंबरला या पोलिसाला फेसबुकवर गौरी मुखर्जी नावाच्या एका महिलेशी मैत्री झाल्यानंतर तिने त्याचा विश्वास संपादन केला. तसेच आपण कोलकाता येथे राहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. अमेरिकेतील आपल्या काकांमार्फत या व्यवसायात गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतात, असे प्रभोलन तिने या पोलिसाला दाखवले. सुरुवातीला ४० हजार रुपये भरल्यानंतर पोलिसाला त्याच्या खात्यात ३० हजारांचा नफा झाल्याचे दिसू लागले. त्यानंतर अधिक नफ्याच्या प्रलोभनाने या पोलिसाने दोन लाखांची रक्कम भरली. त्यानंतर त्याच्या खात्यात तब्बल ३७ लाख १८ हजार रुपये नफा झाल्याचे दिसत असल्याने पोलिसाने २० लाख काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्याला विविध करांच्या नावाखाली पुन्हा पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे या पोलिसाने दीड महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८ लाख ९८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा केले.

महिलेकडून धमकी
या पोलिसाला आणखी रक्कम भरण्याबाबत सांगण्यात येऊ लागले. या पोलिसाने अधिक पैसे भरण्यास नकार दिला असता, महिलेने पैसे भरल्याशिवाय मूळ रक्कम आणि परतावा मिळणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पोलिसाने प्रथम सायबर पोर्टलवर व त्यानंतर कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com