फटफट्या मोटारसायकलवर कारवाई

फटफट्या मोटारसायकलवर कारवाई

Published on

खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघर परिसरात प्रचंड आवाज करणाऱ्या मोटारसायकलवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वृद्धांसह रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

खारघर परिसरात सायलेंसरमध्ये बेकायदा बदल केलेल्या, तसेच मोठा आवाज करणाऱ्या मोटार सायकल चालवित आहेत. तसेच वाढत्या ध्वनीप्रदूषणाबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होताच खारघर वाहतूक शाखेने सोमवारी (ता. ९) सायंकाळी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत मुख्य चौक, अंतर्गत रस्ते व रहदारीच्या ठिकाणी मोटारसायकलची तपासणी केली असता, फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या दुचाकी, तसेच कागदपत्रांतील त्रुटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मोठा आवाज करणारी एक मोटारसायकल जप्त करून विनाहेल्मेट, विना परवाना वाहनावर कारवाई करण्यात आली.

खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर म्हणाले की, ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या मोटरसायकलविरोधात ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व शांतता राखण्यास सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com