अंबरनाथकरांना डावलून कल्याणला लाभ

अंबरनाथकरांना डावलून कल्याणला लाभ
Published on

अंबरनाथकरांना डावलून कल्याणला लाभ
वैद्यकीय महाविद्यालयाचा सात वर्षांचा करार

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : अंबरनाथच्या हद्दीत उभारल्या जात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळणारी रुग्णसेवा स्थानिक नागरिकांना न मिळता थेट शेजारच्या कल्याण शहराच्या पदरात पडणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथच्या जमिनीवर आणि येथील नागरिकांच्या संसाधनांवर उभ्या राहत असलेल्या या महाविद्यालयासाठी प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसोबत तब्बल सात वर्षांचा सामंजस्य करार केल्याने शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या करारानुसार, अंबरनाथमधील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी रुग्णसेवा देण्यासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय व शक्तिधाम प्रसूतिगृहात कार्यरत राहणार आहेत. परिणामी, अंबरनाथकरांना त्यांच्या हक्काची वैद्यकीय सेवा मिळणार नसल्याची भावना बळावत असून, नागरिकांकडून प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.
वादाच्या केंद्रस्थानी अंबरनाथमधील फार्मिंग सोसायटीची सुमारे २१० एकर जमीन आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही जमीन शासनाच्या ताब्यात देण्यात आली असून, नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची पाहणीही केली आहे. मात्र, मुख्य इमारतीचे काम अद्याप सुरू न झाल्याने महाविद्यालय सध्या अंबरनाथमधील डेंटल कॉलेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. येथे सध्या सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नियमानुसार, या विद्यार्थ्यांची वैद्यकीय सेवा अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात किंवा ग्रीन सिटी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक सुविधा डावलून थेट कल्याणमधील रुग्णालयांना प्राधान्य देण्यात आले आहे.
माजी नगरसेवक व रुग्णमित्र उमर इंजिनिअर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष वर्मा यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. छाया रुग्णालयात हाडांचे डॉक्टर व स्त्रीरोगतज्ज्ञांची कमतरता असून, शस्त्रक्रिया रखडल्या आहेत; रुग्ण अधिकारी सुट्टीवर असताना महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रशासनाकडून लवकरच स्पष्टीकरण दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

कराराला दुजोरा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी या करारास दुजोरा देत सांगितले की, जोपर्यंत महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत पूर्ण होत नाही किंवा सात वर्षांचा कालावधी संपत नाही, तोपर्यंत ही सेवा कल्याणच्या रुग्णालयांनाच मिळणार आहे.

फोटो - 427

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com