अलिबागमध्ये २ हजार ४७० मतदारांची ‘नोटा’ला पसंती

अलिबागमध्ये २ हजार ४७० मतदारांची ‘नोटा’ला पसंती

Published on

अलिबागमध्ये दोन हजार ४७० मतदारांची ‘नोटा’ला पसंती
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. ९) जाहीर झाला. या निवडणुकीत शिंदे गट २१, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट १६, भाजप १५, ठाकरे गट पाच व काॅंग्रेस दोन अशा जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. अलिबागमध्ये सातपैकी सहा जागांवर शिंदे गट तर एका जागी अजित पवार गटाने विजय मिळविला आहे. यासोबतच तालुक्यात तब्बल दोन हजार ४७० मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती दिली आहे.
गेल्या काही वर्षांत राजकारणात झालेले बदल, अनेक राजकीय पक्षांनी गमावलेली त्यांची विश्वासार्हता यामुळे अनेक मतदारांनी निवडणूक रिंगणातील एकाही उमेदवाराला आपले समर्थन दिलेले नाही. यामध्ये तरुण मतदारांचा मोठा वाटा असल्याचे मत राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होत आहे. अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गट आहेत. यामध्ये थळ, आवास, काविर, चैल, चेंढरे, शहापूर व आंबेपूर या जिल्हा परिषद गटांचा समावेश आहेत. आंबेपूर गटात शिवसेनेच्या रसिका केणी या ११ हजार ९७४ मतांनी विजयी झाल्या. मात्र, या गटात ३६९ मतदारांनी नोटाला मतदान केले. काविर गटात शिवसेनेचे अनंत गोंधळी नऊ हजार ६९९ मतांनी विजयी झाले. या गटात २०६ मतदारांनी नोटाला मतदान केले. थळमध्ये शिवसेनेच्या मानसी दळवी या १४ हजार ३२८ मतांनी विजयी झाल्या. येथे ४७० मतदारांनी नोटाला पसंती दिली. चैल गटात शिवसेनेचे सचिन राउळ १० हजार २२३ मतांनी विजयी झाले. या गटात २६३ मतदारांनी नोटाला पसंती दिली. आवास गटात शिवसेने दिलीप भोईर ११ हजार ९३३ मतांनी विजयी झाले. येथे ३५८ मतदारांनी नोटाला पसंती दिली. चेंढरे गटात शिवसेनेच्या अदिती दळवी या ११ हजार ३१३ मतांनी विजयी झाल्या. येथे ५७७ मतदारांनी नोटाला मतदान केले, तर शहापूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अमित नाईक हे आठ हजार ९०८ मतांनी विजयी झाले. येथे २२७ मतदारांनी नोटाला पसंती दिली. असे एकूण दोन हजार ४७० मतदारांनी नोटाला मतदान करून निवडणूक रिंगणातील उमेदवाराला आपली असहमती दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com