सपाच्या नगरसेवकांनी सेक्युलर फ्रंटमध्ये यावे
सपाच्या नगरसेवकांनी सेक्युलर फ्रंटमध्ये यावे
खासदार सुरेश म्हात्रे यांचे आवाहन
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : भिवंडीतील मतदारांनी सेक्युलर विचारांच्या पक्षांच्या उमेदवारांना जनमत दिले आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या निवडून आलेल्या सहा नगरसेवकांनी धर्मनिरपेक्ष विचारांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होऊन काँग्रेस पक्षाला महापौरपदासाठी समर्थन द्यावे. त्यांना उपमहापौरपद देण्यास आम्ही तयार आहेत, असे आवाहन भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नगरसेवक व पक्ष पदाधिकारी एकत्रित बसून वेगळा निर्णय घेऊ शकतात असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला.
शहरातील मतदारांनी धर्मनिरपेक्ष विचारांच्या काँग्रेस (३०), राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) (१२) व समाजवादी पक्ष (६) यांना असे घवघवीत यश दिले आहे. पक्षश्रेष्ठींनी भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. पण समाजवादी पक्षाचे नगरसेवक हे सहभागी होण्यास तयार नसल्याने सत्ता स्थापनेत अडसर निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाचे बहुमताचे संख्यागणित अडकून पडले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२ नगरसेवक असतानाही सहा सदस्य असणाऱ्या समाजवादी पक्षाला उपमहापौरपद देण्यास आम्ही तयार आहोत असे खासदार म्हात्रे म्हणाले. परंतु या बाबत येत्या दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पक्षाचे शहराध्यक्ष शोएब खान सर्व १२ नगरसेवक यांच्या सोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सुरेश म्हात्रे म्हणाले.
फोटो - 431
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

