वाढीव क्षेत्रफळासाठी अतिरिक्त पैसे आकारू नका

वाढीव क्षेत्रफळासाठी अतिरिक्त पैसे आकारू नका

Published on

वाढीव क्षेत्रफळासाठी अतिरिक्त पैसे आकारू नका
एल्फिन्स्टन पूलबधितांची मागणी; मध्यवर्ती भागातील घरे हिरावल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या राहिवाशांना एमएमआरडीएकडून घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, सदर सर्व घरांचे क्षेत्रफळ एकसमान नसल्याने उपलब्धतेनुसार घरे दिली जात आहेत. त्यामुळे देय असलेल्या घराच्या तुलनेत जादा क्षेत्रफळाचे घर दिल्यास त्याची वाढीव किंमत भरावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित राहिवाशांनी आमची प्राईम लोकेशनची घरे प्रकल्पामुळे गेली आहेत. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्रफळासाठी वाढीव किंमत आकारू नका आधी मागणी राहिवाशांकडून केली जात आहे.
एल्फिन्स्टन पुलाच्या जागेवर एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार असून, त्यासाठी जुना पूल काढला जात आहे. त्यामुळे येथील लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बांधित होणार असून, तेथील एकूण ७८ प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून एमएमआरडीएने म्हाडाकडून रेडिरेकनरच्या ११० टक्के एवढी किंमत देऊन घरे विकत घेतली, पण त्यापैकी अनेक घरे संबंधित राहिवाशाला देय असलेल्या घरांच्या तुलनेत मोठी असल्याने त्याची वाढीव किमती भरण्याबाबत एमएमआरडीएकडून राहिवाशांना कळवले जात आहे, परंतु अनेक राहिवाशांना १०-२० लाख रुपयांची वाढीव किंमत भरणे शक्य नाही. तसेच आमची मुख्य रस्त्यालागत घरे होती. त्याचा विचार करून एमएमआरडीए वाढीव क्षेत्रफळासाठी अतिरिक्त पैसे आकारू नयेत अशी मागणी राहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली असल्याची माहिती हाजी नुरानी चाळीचे सचिव मूनाफ ठाकूर यांनी सांगितले. याबाबत एमएमआरडीए काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपलब्ध सदनिकांचे क्षेत्रफळ, संख्या
- ३५०-४०० चौरस फूट - २४ सदनिका
- ४००-५०० चौरस फूट - ३२ सदनिका
- ५००-६०० चौरस फूट - ८ सदनिका
- ६००-७०० चौरस फूट - ५ सदनिका
- ७०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाच्या काही सदनिका आहेत.

पुनर्वसनाचे निकष
- ३०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना ३०० चौरस फूट अधिक ३५ टक्के अतिरिक्त असे एकूण ४०५ चौ. फू. क्षेत्राची सदनिका देय.
- ३०० ते १,२९२ चौ. फू. क्षेत्रामधील घरमालकांना विद्यमान क्षेत्र अधिक ३५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाप्रमाणे नवे घर दिले जाणार.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com