सारसोळे जेटी परिसर झाला चकाचक
सारसोळे जेट्टी परिसर झाला चकाचक
लोकसहभागातून प्रभावी स्वच्छता मोहीम
नेरूळ, ता. १० (बातमीदार)ः स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत सारसोळे जेट्टीलगत असलेल्या खाडीकिनारी रविवारी (ता. ८) विशेष स्वच्छता मोहीम राबवल्याने हा परिसर चकाचक झाला. नवी मुंबई महानगरपालिकेने संयुक्तपणे राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आणि एन्कायरमेंट लाइफ फाउंडेशन, मॅनग्रीव्हज सोल्जर या संस्थांच्या व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने पाम बीच रस्त्यालगतच्या सारसोळे जेट्टीलगत असलेल्या खाडीकिनारी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, परिमंडळ २ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत नेरकर, नेरूळ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली उपमुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेरे, स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांनी आपल्या सहकारी स्वच्छता निरीक्षक विजय नाईक व नवनाथ ठोंबरे व उपस्वच्छता निरीक्षक यांच्यासह लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली.
या मोहिमेत एन्कायरमेंट लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेश बराई, मॅनग्रीव्हज सोल्जरचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्वच्छतेची सामूहिक शपथ घेण्यात आली.
चौकट
संयुक्त सहभागातून परिसराचा कायापालट
कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न कॉलेज वाशी, एसआयईएस कॉलेज नेरूळ, एस. के. कॉलेज नेरूळ, एमजीएम कॉलेज कळंबोली, सरस्वती कॉलेज खारघर, रामशेट ठाकूर कॉलेज पनवेल, ए. सी. पाटील कॉलेज पनवेल, जनार्दन भगत शिक्षण संस्था कॉलेज पनवेल या प्रतिष्ठित महाविद्यालयांतील २०० हून अधिक एनएसएसचे विद्यार्थी यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग होता. या वेळी २५० हून अधिक गोणी प्लॅस्टिक बाटल्या, थर्माकोल असा कचरा संकलित करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

