उप कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याला तीन पदके

उप कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याला तीन पदके
Published on

उप कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याला तीन पदके
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : कोपरगाव येथे ७ आणि ८ जानेवारी २०२६ रोजी पार पाडलेल्या महाराष्ट्र राज्य उप कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याला तीन पदकांवर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये ठाणे महापालिका अ‍ॅथलेटिक प्रशिक्षण योजना (टीएमसीएपीवाय) अंर्तगत खेळणाऱ्या दोन खेळाडूंनी एक सुवर्णपदकासह एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात काव्या कनागळेने ८० मीटरमध्ये सुवर्ण आणि चार गुणीले १०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले. तसेच आठ वर्षांखालील मुलांच्या गटात युवान भावसारने स्टँडिंग ब्रॉड जंपमध्ये कांस्यपदक जिंकले. विजयानंतर मी कामगिरीवर खूप खूश आहे. स्प्रिंट इव्हेंटमध्ये हे माझे पहिले राज्यस्तरीय पदक आहे. आता मी माझ्या अंतिम परीक्षेचा अभ्यास करेन आणि नंतर पुढील हंगामाची तयारी सुरू करेन, असे वक्तव्य काव्या कनागळेने या वेळी केले.
-------------
कोट
काव्या भविष्यासाठी चांगली प्रतिभा आहे. युवानने चांगली कामगिरी केली. गेल्या वर्षी त्याच स्पर्धेत तो पदक गमावला होता. आरव, स्नेह, अर्चित, इरा आणि अन्वी यांना स्पर्धेत चांगला अनुभव होता. टीएमसीएपीवाय योजना प्रमुख मीनल पलांडे आणि अशोक आहेर यांनी सर्व खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
- नीलेश पाटकर, प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com