आम्हाला लोकांचे प्रश्न मांडू द्या : खा. नरेश म्हस्के
आम्हाला लोकांचे प्रश्न मांडू द्या : खासदार नरेश म्हस्के
संसदेत पहिल्यांदाच निवडून गेलेल्या खासदारांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करत मंगळवारी (ता. १०) संसदेबाहेर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह नव्याने पहिल्यांदाच निवडून गेलेल्या सर्व पक्षीय खासदारांनी निषेध आंदोलन केले.
गेल्या दीड वर्षात विरोधी पक्षाने संसदेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले आहे. कोणत्याही विषयावर नीट चर्चा होत नसून नवीन खासदारांना आपले मतदारसंघातील मुद्दे, प्रश्न मांडता येत नाहीत. यामुळे नवीन खासदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. मंगळवारी या नाराजीला नवीन खासदारांनी वाट मोकळी करून देत संसदेबाहेर फलकाद्वारे संदेश देत नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून आम्ही संसदेत येत आहोत. मात्र, कोणालाही बोलण्याची संधी मिळत नाही. सभागृह वारंवार तहकूब केले जात आहे. खासदार म्हणून निवडून येताना देशाप्रती असलेली जबाबदारी, मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा अधिकार आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचे कर्तव्य आमच्यावर असते. संसदेच्या अधिवेशनात सहभागी होऊन अर्थसंकल्पावर चर्चा करणे, विकासकामांसाठी आवाज उठवणे आणि जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे, ही आमची जबाबदारी असते. संसद बंद ठेवून जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न या वेळी पहिल्यांदाच निवडून गेलेल्या खासदारांनी केले. या आंदोलनात अपक्ष खासदार उमेश पटेल, अरुण भारती (लोक जनशक्ती पार्टी रामविलास), राजीव वर्मा (लोक जनशक्ती पार्टी रामविलास) हे सहभागी झाले होते.
…………
कोट :-
आम्ही सामान्य जनतेमुळे निवडून आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ नये. ज्यांना बोलायचे नाही त्यांनी बाहेर जावे, पण आम्हाला बोलू द्यावे, संसद चालू द्यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
- नरेश म्हस्के, खासदार, ठाणे लोकसभा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

