विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा
Published on

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा
टोकावडे येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

मुरबाड, ता. १० (बातमीदार) : जयवंतराव पवार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय टोकावडे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळेगाव येथे वनराई बंधारा बांधून गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार शिबिर ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत तळेगाव येथे पार पडले. शिबिरात ४० विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, विद्यार्थी संस्कार व करिअर, सांघिक एकता आदी विषयांवर विविध वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्कार शिबिराचा समारोप सोमवारी (ता. ९) तालुक्यातील तळेगाव येथे पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक अशोक पाठारे, तळेगावचे सरपंच राजेंद्र शिंगवा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, उद्योजक लालाजी देशमुख, विलास देशमुख, प्राचार्य डॉ. मधुकर डोंगरे, नामदेव थाटसिंगर, सविता देशमुख उपस्थित होते. या वेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून जितेश वारघडे व तनुजा पडवळ यांची निवड करण्यात आली. कष्टाळू स्वयंसेवक म्हणून समीक्षा देशमुख व तेजस घुटे यांना गौरवण्यात आले. या वेळी श्रुती भांगरत, साक्षी दिनकर, जितेश वारघडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विशाल देसले व दीपिका डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

फोटो - 448

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com