टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी शहरालगत तडाली-वळ पाइपलाइन रोडने जाणाऱ्या एका दुचाकीला मागून येणाऱ्या टेम्पोने दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दीपककुमार अरविंद करनिया (४६) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
दीपककुमार हे आपल्या दुचाकीने तडाली-वळ या मार्गाने जात असताना नाल्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघाताने दीपककुमार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना ठाण्यातील खासगी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

