

माहीम जंक्शनवर स्वच्छतागृहाचा अभाव
सहा फलाट असतानाही मूलभूत सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
धारावी, ता. १० (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील माहीम जंक्शन स्थानकात सहा फलाट असतानाही येथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फलाट क्रमांक एकवर एका स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, ड्रेनेज लाइनच्या समस्येमुळे तीही अनेक दिवस बंद आहे. अशात रेल्वे प्रशासनाने त्वरित या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
माहीम जंक्शन हे पश्चिम रेल्वेवरील अत्यंत वर्दळीचे स्थानक. चर्चगेट असो, विरार असो अथवा हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स अथवा पनवेल स्थानक. येथून धारावीतील रहिवाशांना प्रवास करणे सोईस्कर होते. त्यामुळे येथे सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रात प्रवाशांची मोठी गर्दी पाहण्यास मिळते. अशात एवढं मोठे जंक्शन असतानाही येथे साधी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात होत आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी मोठी अडचण होत आहे. त्यातही महिलांची तर मोठी कुचंबणा होत असून, किमान फलाट क्रमांक एकवरील स्वच्छतागृह लवकरात-लवकर सुरू करावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
------------
येथे फलाट क्रमांक एकवर प्रसाधनगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, तेही अनेक महिन्यांपासून सेवेसाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांना थेट स्थानकाबाहेर येत पालिकेच्या शौचालयाचा वापर करावा लागत आहे. पालिकेचे हे शौचालय फलाट क्रमांक एकच्या दिशेने आहे, म्हणजे फलाट क्रमांक सहावरील प्रवाशांसाठी पोहोचणे अशक्य असेच म्हणावे लागेल.
------------------
फलाट क्रमांक एकवरील शौचालय नूतनीकरण करून तयार आहे. मात्र, पालिकेच्या ड्रेनेजमध्ये शौचालयाची जोडणी होण्यास अडचण निर्माण झाली आहे. शौचालय चालू करण्यासाठी अजून एक महिना तरी लागेल.
- राकेश सिंह, प्रबंधक, माहीम स्थानक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.