प्रदूषणाविरोधात युवा मैदानात

प्रदूषणाविरोधात युवा मैदानात

Published on

प्रदूषणाविरोधात युवा मैदानात
मिरा-रोडमधील विद्यार्थी अभ्यास करणार
भाईंदर, ता.१० (बातमीदार) : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मिरा-रोड येथील दालमिया मॅनेजमेंट महाविद्यालयाचे विद्यार्थी शहरातील हवा प्रदूषणाचा अभ्यास करणार आहेत. तसेच त्याबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल महापालिकेला देणार आहेत.
मिरा-भाईंदर शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १२७ च्या आसपास आहे. निर्देशांक १०० पेक्षा कमी असल्यास हवेची गुणवत्ता समाधानकारक मानली जाते. मात्र, निर्देशांकाने शंभरी पार केली असल्याने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मिरारोड येथील दालमिया मॅनेजमेंट महाविद्यालयाचा देशातील पहिल्या ५० महाविद्यालयांमध्ये समावेश होतो. शहरातील हवा प्रदूषणावर संशोधन करण्याच्या सूचना या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत. शहरातील सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट प्रकल्प, इमारत बांधकामातून होणाऱ्या हवा प्रदूषणबरोबर पालिकेकडून विकास कामांसाठी सुरू असलेले खोदकाम, मातीची वाहतूक अशा सर्व घटकांचा अभ्यास अहवालातून केला जाणार आहे. तसेच हवा प्रदूषित होण्यास कारणीभूत ठरणारे घटक कोणते, प्रदूषण नेमके कसे होते, याचा तपशीलवार अभ्यास अहवालातून मांडला जाणार आहे.
-------------------------------
पुस्तकातून मांडणी
विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन, शिफारसी याचा आढावा घेऊन त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच हा अहवाल पुस्तक रूपाने प्रकाशीतही केला जाणार असल्याचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com