लोकप्रतिनिधी व विभागांची दालने निश्चित
लोकप्रतिनिधी, विभागांची दालने निश्चित
उल्हासनगर पालिकेचा शिक्षण विभाग पुन्हा स्थलांतरित
उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : जवळपास चार वर्षे महापालिका बरखास्त असल्याने मुख्यालयातील दालने ही विविध विभागांना देण्यात आली होती. मात्र आता निवडणूक पार पडल्यावर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांची दालने निश्चित करण्यात आली आहेत. पालिकेतील शिक्षण विभाग आणि समग्र शिक्षा अभियान विभाग पुन्हा वूडलँड कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया हाताळली जात आहे.
महापालिका मुख्यालयात महापौरांचे दालन चार वर्षांपासून बंद ठेवण्यात आले होते. तर उपमहापौरांच्या दालनात वॉर रूम, सभागृह नेत्याच्या दालनात टॅक्सचे कामकाज, विरोधी पक्षाच्या दालनात बाजार परवाना, शिवसेना गटनेत्याच्या दालनात उपयुक्तांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती यांच्या दालनात रेकॉर्ड रूम, काँग्रेस गटनेत्याच्या दालनात उद्यान विभाग, पाणीपुरवठा सभापतींच्या दालनात समग्र शिक्षा अभियान, क्रीडा सभापतींच्या दालनात क्रीडा विभाग, परिवहन सभापतींच्या दालनात परिवहन विभाग कार्यान्वित होते. आता लोकप्रतिनिधी निवडून आल्याने केवळ महापौर व उपमहापौर यांच्याच निवडी झाल्या असून, स्थायी समिती सभापती, पाणीपुरवठा समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणार आहेत.
महापौर दालनाचे सुशोभीकरण सुरू असल्याने महापौर अश्विनी निकम यांच्या कार्यालयाची तात्पुरती स्थायी समिती सभापतींच्या दालनात व्यवस्था करण्यात आली आहे. उपमहापौर अमर लुंड यांना बाजार परवाना कार्यालय देण्यात आले आहे. काँग्रेस गटनेत्याच्या दालनातून उद्यान विभागाचे कार्यालय हलवण्यात आले असून, त्यांना तिसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभागात जागा देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सभापतींच्या निवडणुका झाल्यावर त्यांना आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी निश्चित केल्याप्रमाणे दालने दिली जाणार आहेत.
फोटो - ४६०
उल्हासनगर : पालिकेतील शिक्षण विभाग वूडलँड कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

