पालघर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल

पालघर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल

Published on

पालघर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल
कमाल तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढणार
वाणगाव, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे. ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान अनुक्रमे ३३, ३४, ३५,३५ व ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान पुढील दोन तीन दिवस कमी राहील, तर १४ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान अनुक्रमे १४, १५, १७, १८ व १८ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेतही वाढ होऊन ८५ ते १००% व दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४८% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याची गती तीन ते आठ किमी प्रति तास एवढी राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात सलग पुढील दोन आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून, किमान तापमान सरासरी एवढे किंवा सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.
-------------------------------------
बागायतदारांना आवाहन
ः- तापमानात वाढ होत असल्याने फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, काजू, केळी व चिकू शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी देण्यासाठी शक्यतो संध्याकाळची किंवा सकाळची वेळ निवडावी.
- झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड रोपांची कडक उन्हामळे पाने करपू नयेत म्हणून सावली करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com