बारावी परीक्षार्थींसाठी केंद्रापासून बससेवा
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पायपीट
- आ. संजय केळकर यांच्या सूचनेनंतर विद्यार्थ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : बारावीच्या परीक्षेला मंगळवार (ता. १०) पासून सुरुवात झाली. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक विभागासह काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीदेखील रिक्षाचालकांना भाडे नाकारू नये तसेच वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. असे असतानादेखील परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शेअर रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याने विद्यार्थ्यांची लूट झाली, तर विशेष बसेसची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागल्याचे दिसून आले.
कासारवडवली येथे आदर्श विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी परीक्षेचे केंद्र असून, येथे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी पेपर सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना बससाठी चालत घोडबंदर मार्गावर चालत यावे लागले. तर शेअर रिक्षाचालक प्रति प्रवासी ६० ते ७० रुपये आकारत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती. ही बाब पालकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर केळकर यांनी तात्काळ ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना पत्र देऊन या विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याची सूचना केली. आता ही बससेवा परीक्षा काळात दररोज दुपारी १.५० वाजता केंद्रापासून ते ठाणे स्टेशनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---------------
ही बस केंद्रापासून कासारवडवली, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, गोकुळनगर, कोर्ट नाका या मार्गाने स्टेशनकडे जाणार आहे. त्यामुळे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षाकाळात सुविधा मिळाल्याने पालकांनी केळकर यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

