आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग नियंत्रण मोहीम

आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग नियंत्रण मोहीम

Published on

आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग नियंत्रण मोहीम
कासा, ता. १० (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग (फायलेरियासिस) निर्मूलनासाठी विशेष औषधोपचार मोहिमेचा प्रभावी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेस लोकप्रतिनिधी, आरोग्य यंत्रणा तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी आमदार विनोद निकोले यांनी स्वतः औषधांच्या गोळ्या घेऊन उपस्थित नागरिकांमध्ये औषधसेवनाबाबत विश्वास निर्माण केला. त्यामुळे औषधांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर होण्यास मदत झाली. कार्यक्रमाला सोगवे गावचे सरपंच कॉ. लहानी दौडा, माकपा तालुका सचिव कॉ. रडका कलांगडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांचाळ, प्रिया तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत डी.ई.सी. व अल्बेंडाझोल या गोळ्यांचे सामूहिक औषधोपचार करण्यात आले. हत्तीरोगामुळे पाय सुजणे, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच सामाजिक अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी नियमित व पूर्ण औषधसेवन अत्यावश्यक असल्याचे आरोग्य तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या वेळी बोलताना आमदार विनोद निकोले म्हणाले, “हत्तीरोग हा पूर्णपणे टाळता येण्यासारखा आजार आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार वेळेवर आणि नियमित औषधे घेतल्यास या आजाराचे उच्चाटन नक्कीच शक्य आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने पुढे येणे गरजेचे आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com