कोगदे गावात ‘अवकाशातून बर्फाचा गोळा’ पडल्याची चर्चा

कोगदे गावात ‘अवकाशातून बर्फाचा गोळा’ पडल्याची चर्चा

Published on

कोगदे गावात अवकाशातून बर्फाचा गोळा पडल्याची चर्चा
जव्हार, ता. १० (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील कोगदे गावात सोमवारी (ता. ९) सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास अवकाशातून बर्फाचा गोळा पडल्याची घटना घडल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेमुळे गावात कुतूहल आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी गावातील काही मुले खेळत असताना अचानक जमिनीवर मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने पाहणी केली असता जमिनीवर बर्फासारखा थंड, पांढरट रंगाचा गोळा आढळून आला. उत्सुकतेपोटी मुलांनी तो हातात उचलून पाहिला असता तो बर्फाचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुलांनी आनंदाने बर्फाचे तुकडे एकमेकांना दाखवत खेळ सुरू केला.
ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. साधारणतः या परिसरात अशा प्रकारची घटना क्वचितच घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. काहींनी हवामानातील बदलाशी ही घटना जोडली, तर काहींनी अवकाशातून घडलेल्या घटनेची शक्यता व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असून, पुढील तपासासाठी संबंधित कार्यालयांना कळविण्यात आल्याचे जव्हार तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
फोटो ओळ ः जव्हार : जमिनीवर अचानक पडलेले बर्फाचे गोळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com