बाल अपहरणाच्या संशयावरून महिला अटकेत

बाल अपहरणाच्या संशयावरून महिला अटकेत

Published on

बाल अपहरणाच्या संशयावरून महिलेला अटक; न्यायालयीन कोठडी
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : विद्याविहार परिसरात एका लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून घाटकोपर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरोल व्हिलेज येथील खलई परिसरात सोमवारी रात्री एका घरातील वीज बंद असल्याचा फायदा घेत संबंधित महिला घरात घुसली. तिने घरातील लहान मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या वेळी घरात उपस्थित असलेल्या मुलाच्या आईने हा प्रकार पाहताच आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तत्काळ जमा झाले व त्यांनी संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्राथमिक चौकशीत संबंधित महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी तिला नोटीस देऊन सोडून दिल्याचे समजते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तिला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पोलिस तिच्या घरी गेले असता ती घर सोडून निघून गेल्याचे आढळून आले.
यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून संबंधित महिलेला पुन्हा ताब्यात घेतले. नागरिकांच्या तक्रारी आणि प्राथमिक तपासानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री प्रकाश मेहता तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली. पुढील तपास घाटकोपर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com