निनादेवी क्रिकेट चषक स्पर्धेत अन्वी स्पोर्ट्सचा विजयी जल्लोष
निनादेवी क्रिकेट चषक स्पर्धेत अन्वी स्पोर्ट्सचा विजयी जल्लोष
प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) ः गावातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री निनादेवी चषक २०२६’ या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत अन्वी स्पोर्ट्स (देवगड) संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
निनादेवी प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा प्रभादेवी येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. एकूण २४ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सुरुवातीपासूनच चुरशीचे सामने, खेळाडूंची दमदार फलंदाजी-गोलंदाजी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. अंतिम सामन्यात अन्वी स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट संघभावना आणि संयमी खेळाच्या जोरावर विजय मिळवला. विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख रक्कम आणि भव्य चषक प्रदान करण्यात आला. उपविजेता शौर्या इलेव्हन (मालाड) संघाला ३० हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. श्री निनादेवी प्रतिष्ठान (पांगरे बु.) यांच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावागावातील तरुणांना क्रीडाक्षेत्रात संधी देणारी ही स्पर्धा भविष्यातही अधिक मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

