नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य

नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य

Published on

नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य
महापौर अश्विनी निकम यांचे पहिल्या आढावा बैठकीत निर्देश

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : दीर्घकाळ प्रलंबित नागरी प्रश्नांवर पहिल्याच अधिकृत बैठकीत थेट चर्चा करत, मूलभूत सुविधा म्हणजे केवळ कागदावरची नव्हे, तर प्रत्यक्षात दिसणारी व्यवस्था असली पाहिजे. नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार मूलभूत सुविधा मिळणे हा प्रशासनाचा सर्वात मोठा उद्देश असला पाहिजे, असे निर्देश महापौर अश्विनी निकम यांनी दिले. बैठकीला महापालिका आयुक्त मनीषा अव्हाळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांनी स्वतःची ओळख करून देत, आपल्या विभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची तसेच शहरातील प्रमुख अडचणींची थोडक्यात माहिती महापौरांसमोर सादर केली. प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेत, महापौरांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. भटकी कुत्री नियंत्रणासाठी डॉग सेंटर संदर्भातील उपाययोजना, शहरातील वाढती धूळ व वायू प्रदूषण रोखण्यासाठीचे नियोजन, पाणी गळतीमुळे होणारा अपव्यय व नागरिकांच्या तक्रारी, तसेच शहरातील अनेक भागांत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि रखडलेली दुरुस्तीची कामे या मुद्द्यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
कोणताही विभाग स्वतंत्रपणे नव्हे, तर समन्वयाने काम केल्यासच शहराचा सर्वांगीण विकास शक्य आहे. प्रशासनातील निर्णय प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजेत, केवळ फाइली फिरवून समाधान मानले जाणार नाही, असा इशाराही महापौरांनी दिला.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, भाजप गटनेते राजेश वधारीया, शिवसेना गटनेते अरुण आशान, नगरसेवक जमनू पुरुस्वानी यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


फोटो - 608

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com