युवा खेळांडुसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

युवा खेळांडुसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
Published on

युवा खेळाडूंसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
शेणसरी-गांगोडीत पोलिस सरावासाठी क्रीडा साहित्यवाटप
कासा, ता. ११ (बातमीदार)ः शेणसरी-गांगोडी गावातील पोलिस भरतीस इच्छुक युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या मैदानी तयारीसाठी आवश्यक क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील युवकांना सरकारी नोकरीत यश मिळावे, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला आहे.
ग्रामपंचायतीने शॉटपुट (पुरुष व महिला), फोकस, व्हॉलीबॉल नेट व व्हॉलीबॉल, पुशअप साहित्य, कोन जंप इक्विपमेंट्स, कोन पॅक व कोन मार्कर पॅक, स्पीड हर्डल (मोठे व लहान), स्पीड काउंटर, हँड ग्रिप, मार्कर, व्हाईट बोर्ड, रबर बँड, स्टॉप वॉच, उडी दोरी, टायर, चुना व दोरी आदी क्रीडा साहित्याचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे युवकांना नियमित सराव करणे शक्य होणार आहे. तसेच पोलिस भरतीत मैदानी चाचण्यांसाठी आवश्यक शारीरिक क्षमता अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. या कार्यक्रमाला सरपंच साधना निलेश बोरसा, उपसरपंच हिरा सुरेश जाधव, ग्रामपंचायत अधिकारी जिज्ञा जितेंद्र पाटील, सदस्य विजय वाडू, योगेश वरठा, दिनेश भुसारा, रविता बोरसा, गुलाब बोरसा, रेखा रायात, रंजना पागी, पेसा अध्यक्ष नामदेव गोविंद माहला, पेसा सदस्य भास्कर बारी, सुशील भुसारा व चंदा बारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com