समस्याग्रस्त कर्जतकरांची नगरपरिषदेत धडक

समस्याग्रस्त कर्जतकरांची नगरपरिषदेत धडक

Published on

समस्याग्रस्त कर्जतकरांची नगरपरिषदेत धडक
समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
कर्जत, ता. ११ (बातमीदार) ः शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कर्जत शहर बचाव समितीने बुधवारी (ता. ११) नगर परिषदेत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन सादर दिले. ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी तब्बल ५० समस्यांचा पाढाच वाचून दाखवला असून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
या निवेदनात शहरातील पार्किंगची कमतरता, पाणीटंचाई, रस्त्यातील अडथळा ठरणारे वीज पोल हटवणे, बाजारपेठेतील वाढती अनधिकृत रिक्षा संख्या, चारफाटा व श्रम-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही व सिग्नल व्यवस्था, एक्सप्रेस मार्गावरील अडचणी, भटकी कुत्री, कचरा संकलन आणि काही कर्मचाऱ्यांची वागणूक आदी मुद्द्यांचा समावेश आहे. कर्जत चौक रस्त्यावर दुभाजक उभारण्याची मागणीही करण्यात आली. यासंदर्भात
शहरातील ५० समस्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना आणि नव्याने आलेल्या लोकप्रतिनिधींनाही दिले आहे. महिन्याभरात ठोस कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कैलास मोरे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com