बुलेट ट्रेन प्रकरणात भ्रष्टाचार

बुलेट ट्रेन प्रकरणात भ्रष्टाचार

Published on

बुलेट ट्रेन प्रकल्पात भ्रष्टाचार!
सुरेश म्हात्रे यांचा कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांवर आरोप

भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांनी भूसंपादनातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी मंगळवारी केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भिवंडी न्यायालयात दाखल अर्जाच्या सुनावणीप्रसंगी खासदार म्हात्रे स्वतः भिवंडी न्यायालयात मंगळवारी हजर होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांवर आरोप केला.
सुरेश म्हात्रे म्हणाले, की बुलेट ट्रेनमध्ये जमीन बाधित होण्यासाठी कपिल पाटील यांचे पुतणे प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील आणि मुलगा सिद्धेश पाटील यांनी मौजे दिवेअंजूर येथील सर्व्हे क्रमांक २८ या जमिनीचा खोटा विकसक करारनामा करून ती जागा बाधित होत असल्याचे दाखवून या मोबदल्यात २० कोटी १३ लाख रुपयांचा मोबदला शासनाकडून मिळवला आहे. यावरच यांचा भ्रष्टाचार थांबला नसून, जून २०२४मध्ये याच मोबदला दिलेल्या जमिनीचे फेरमूल्यांकन करून त्यापोटी १९३ कोटी रुपये देण्याची शिफारस शासनाने केली आहे. मात्र हे सर्व व्यवहार खोटे व धक्कादायक असून, जो विकास करारनामा २०१२मध्ये नोंदवला गेला त्यासाठी वापरलेला स्टॅम्प पेपर हा २०१६चा आहे. तर त्यावरील प्रशांत पाटील यांचा फोटो २०१८मधील आहे. याचे सर्व पुरावे आपण शासन, पोलिसांकडे व संसदेतील सभागृहात उपस्थित करून हे प्रकरण न्यायालयात दाखल केले असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. बुलेट ट्रेनसाठी लागणारा पैसा जनतेच्या करातून शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र त्यात जर अशा प्रकारे कुणी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आज त्यासाठीच आपण स्वतः भिवंडी न्यायालयात हजर होतो, असे खासदार म्हात्रे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com