विरार-डहाणू चौपदरीकरण संथगतीने
विरार-डहाणू चौपदरीकरण संथ गतीने
डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवा, रेल्वे प्रवाशांची मागणी
पालघर, ता. ११ (बातमीदार)ः विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम २०१६ मध्ये सुरू झाले आहे, परंतु भूमी अधिग्रहण, कांदळवन तोडणी मंजुरी मिळण्यास खूप उशीर झाल्याने हा प्रकल्प पूर्ण झालेला नसल्याने प्रवाशांना विविध अडचणी उद्भवत आहेत.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळा मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या कार्यालयात भेटी देऊन निवेदने देत विरार-डहाणू दरम्यान सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. माहिती अधिकारात हा प्रकल्प अनुक्रमे २०२२, २०२३, २०२४ मध्ये पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले. सध्यःस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणण्यानुसार ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, २०१६ ते २०२६ अशा १० वर्षांत फक्त ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित ५३ टक्के काम पूर्ण करण्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता असल्याने डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवा, अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केली आहे.
----------------------------------
विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्णत्वाचा कालावधी लांबला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रवाशांसाठी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे तसेच १५ डब्यांच्या लोकल सुरू करणे गरजेचे आहे.
- दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

