वनविभागाच्या हातावर बिबट्याची तुरी

वनविभागाच्या हातावर बिबट्याची तुरी
Published on

वन विभागाच्या हातावर बिबट्याची तुरी
डहाणू गावातील संरक्षण भिंतीवरून उडी मारून पसार
कासा, ता. ११ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच डहाणू गाव परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा रचला होता. मात्र, रात्री एकच्या सुमारास बिबट्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे.
डहाणू गावातील सुभाष गल्ली परिसरात राहणारे अनिल कांबळे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बंद वाडीमध्ये बिबट्या दिसून आला होता. घटनेची माहिती मिळताच डहाणू वन विभागासह ‘वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर’ (प्राणीमित्र) संस्थेची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, लोकवस्ती असल्याने दिवसा बिबट्याला पकडणे धोक्याचे ठरत होते. त्यामुळे जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बंदूकधारी मागवण्यात आले. रात्री ८ वाजता हे पथक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तास बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी गोळी झाडण्यात आली. मात्र, तरीदेखील रात्री १च्या सुमारास बिबट्याने संरक्षण भिंतीवरून उडी मारत घटनास्थळावरून पलायन केले आहे.
-----------------------------------
पथके तैनात
घटनेनंतर वन विभागाकडून पुन्हा बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त पथके मागवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे वन विभागाचे अधिकारी दिवाकर निरंजन यांनी सांगितले, तर बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डहाणू वना धिकारी नवीन माच्छी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com