

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात अवैध फेरीवाले, तसेच मार्जिनल स्पेस (दुकाने, रस्त्याशेजारील मोकळी जागा)वर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. आता सातत्याने सुरू असलेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेमुळे केवळ फेरीवालेच नव्हे, तर स्थानिक दुकानदार आणि संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनाही सतर्क रहावे लागत आहे.
कोपरखैरणे, घणसोली, सानपाडा, एरोली, दिघा, वाशी, तुर्भे, नेरूळ, दारावे आणि बेलापूर या परिसरांमध्ये अवैध फेरीवाले, बेकायदा बांधकामे, तसेच मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांविरोधात पालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पदपथ व रस्त्यांच्या कडेला उभारलेले तात्पुरते स्टॉल, गाड्या आणि शेड्स हटविण्यात आले असून, संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. घणसोली रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा उभारण्यात आलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या, तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे स्थानक परिसरातील पादचारी मार्ग मोकळे करण्यात प्रशासनाला यश आले.
नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशाराही पालिकेकडून दिला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे काही ठिकाणी फेरीवाल्यांकडून नाराजी व्यक्त होत असली, तरी नागरिकांकडून मात्र मोकळे रस्ते आणि पादचारी मार्ग उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
दंडात्मक कारवाईमुळे दणका
शहरात वाहनांमधून बेकायदा खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. सेक्टर-२५, दारावे परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फूड टॅक्सीवरही पालिका प्रशासनाने कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.