ठाणे भारत सहकार बँक ‘आयकॉनिक लीडर पुरस्कारा’ने सन्मानित
ठाणे भारत सहकार बँक ‘आयकॉनिक लीडर पुरस्कारा’ने सन्मानित
इंटरनेट बँकिंगच्या श्रेणीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरव
ठाणे, ता. ११ : ठाणे भारत सहकार बँकेला इंटरनेट बँकिंगच्या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३० व ३१ जानेवारी रोजी खोपोली येथे झालेल्या सीएक्सओ-१०० शिखर परिषदेत बँकेला इंटरनेट बँकेच्या श्रेणीतील ‘आयकॉनिक लीडर पुरस्कार २०२५’ ने गौरवण्यात आले.
या सहकारी परिषदेत वित्त, तंत्रज्ञान आणि सहकारी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील विशेषतः सहकारी क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. नावीन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ठाणे भारत सहकारी बँक लि. अनेक वर्षांपासून आपल्या ग्राहकांना सेवा देत असून, ग्राहकांकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या बँकेच्या आतापर्यंत ३० शाखा कार्यरत असून त्यांचा व्यवसाय २२८५ कोटी इतका आहे. तसेच लवकरच ठाणे भारत सहकार बँकेची कासारवडवली येथील ३१ वी शाखाही सुरू असल्याच माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

