एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये ‘विश्वधर्मी विश्वनाथ सभागृह’चे उद्घाटन
एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये ‘विश्वधर्मी विश्वनाथ सभागृह’चे उद्घाटन
उलवे, ता. ११ (बातमीदार) : उलवे येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ‘विश्वधर्मी विश्वनाथ सभागृह’चे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे, उषा विश्वनाथ कराड आणि माईर्स एमआयटीचे विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल ही भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणपद्धती यांचा सुरेख संगम साधणारी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. विज्ञान, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक विकास घडविण्यावर येथे भर दिला जातो. योग, ध्यान, कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची परंपरा या शाळेत जोपासली जाते.
राष्ट्रनिर्माण व विश्वशांतीसाठी शिक्षण प्रभावी माध्यम ठरू शकते, या दूरदृष्टीतून उलवेतील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल कार्यरत आहे. या शाळेमुळे उलवे परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केला.
कोट :
अध्यात्म आणि विज्ञान या तत्त्वांवर आधारित शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. मानवी मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जाणीव यांना केंद्रस्थानी ठेवून उभारलेले ‘विश्वधर्मी विश्वनाथ सभागृह’ हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला बळकटी देणारे केंद्र ठरेल. काही नियमांच्या अधीन राहून उलवेतील नागरिकांनाही या सभागृहाचा उपयोग करता येईल.
- प्रा. स्वाती कराड चाटे (विश्वस्त व महासचिव, एमआयटी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

