ठाण्यात परिवहनच्या बसला आग
ठाणे परिवहन विभागाच्या बसला आग
- प्रवाशांची सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : सिडको बस डेपोकडून साकेत रोड मार्गे काल्हेरकडे निघालेल्या ठाणे महापालिका परिवहन विभागाची एम.एच. ०४ एच.वाय. १६८७ या बसला आग लागल्याची घटना बुधवारी (ता. ११) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. बसचे सायलेन्सर तापल्यानंतर ही आग लागल्याचे चालकाला समजताच त्यांनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या २० ते २५ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बसचालक सुशील शेलार व वाहक सागर पाष्टे हे बुधवारी १ वाजण्याच्या सुमारास सिडको बस डेपोकडून साकेत मार्गे काल्हेरकडे निघाले होते. या वेळी गाडीत २० ते २५ प्रवासी प्रवास करत होते. यादरम्यान, अचानक सायलेन्सरने पेट घेतला. बसमधून धूर येत असल्याचे कळताच, ती जागच्या जागी थांबवण्यात आली व त्यानंतर तातडीने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापनाला त्याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. बसला लागलेली आग ही किरकोळ असली तरी काही वेळातच ती आग भडकण्याची शक्यता होती. त्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले, अशी माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी यासिन तडवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

