सैनिक निधीला हातभार

सैनिक निधीला हातभार

Published on

सैनिक निधीला हातभार
अंबरनाथमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित ‘आझादी की जंग, फिल्मों के संग’ या देशभक्तीपर कार्यक्रमातून सैनिकांच्या कल्याणासाठी निधी जमा करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी व नाट्य समीक्षक रामदास कृष्णा कामत यांनी हा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
अंबरनाथ येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोणावळ्यातील स्वामी समर्थ मठानंतर आता शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या मंदिरात कार्यक्रम सादर करण्यात आला. भक्तगण अशा धार्मिक स्थळी जवानांवरील कार्यक्रम ठेवतात, याचा अर्थ माझ्या उपक्रमाला संतांचाही आशीर्वाद आहे, असे भावपूर्ण उद्गार कामत यांनी काढले. कार्यक्रमादरम्यान ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
कामत यांनी १९४३ च्या ‘किस्मत’पासून ते ‘उरी-द सर्जिकल स्ट्राइक’पर्यंतच्या युद्धपटांचा आढावा घेत भारत-चीन (१९६२) तसेच १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ मधील भारत-पाक युद्धांचा इतिहास उलगडला. देशभक्तीपर चित्रपटांच्या संदर्भातून जवानांच्या शौर्यगाथा त्यांनी प्रभावीपणे मांडल्या.

फोटो - 654

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com