तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण
कर्जत, ता. ११ (बातमीदार) : कर्जत शहरातील पोलिस मैदानासमोर असलेल्या एका आठ मजली इमारतीवरून २३ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली; मात्र पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे त्याचे प्राण वाचले असून, मोठी दुर्घटना टळली.
बसुराज निर्वाने (वय २३), सध्या पुलाची वाडी येथे वास्तव्यास असून, मूळचा कर्नाटक राज्यातील आहे. तो वडिलांसोबत राहत होता. महिनाभरापूर्वी त्याने दक्षिण भारतातील मूळ असलेल्या व सध्या कर्जतच्या दहिवळी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले होते. प्रेमविवाह करत संबंधित तरुणीने घरच्यांचा विरोध पत्करला होता. मात्र, लग्नानंतर १५ ते २० दिवस सासरी राहिल्यानंतर ती माहेरी परतली आणि पुन्हा सासरी येण्यास नकार दिला. यामुळे मानसिक तणावाखाली आलेला बसुराज पोलिस ठाण्यासमोरील बांधकाम सुरू असलेल्या आठ मजली इमारतीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांततेने समजूत काढत त्याला सुरक्षितपणे खाली उतरवले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तरुणाला समुपदेशनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

