हमीभाव योजनेचा शेतकऱ्यांना लाभ

हमीभाव योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
Published on

हमीभाव योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
विक्रमगड येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) ः येथील शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभाव योजनेचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने आधारभूत धान्य खरेदी योजना केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या प्रादेशिक कार्यालय, जव्हारअंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय विक्रमगड यांच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
विक्रमगड खरेदी केंद्राचे आदिवासी कार्यकारी सहकारी सोसायटी विक्रमगडचे सभापती मधुकर खुताडे यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले. या वेळी आदिवासी कार्यकारी सहकारी सोसायटी विक्रमगडचे उपसभापती मनोज पाटील, सदस्य चिंतु मोरघा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, प्रगतशील शेतकरी घनःश्याम आळशी, भाजपचे पालघर जिल्हा आर्थिक आघाडीचे मंगेश औसरकर, संस्थेचे सचिव रोहन पाटील, महामंडळ कर्मचारी सुनील गवळी, पुंडलिक तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
-----------------------------------
मध्यस्थांच्या जाळ्यातून सुटका
शासनाच्या अधिकृत केंद्रावर धान्य विक्री केल्यास पारदर्शक व्यवहार होऊन शेतकऱ्यांची मध्यस्थांच्या जाळ्यातून सुटका होणार आहे. तसेच विक्रमगड परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com