नागरी समस्यांचे गाऱ्हाणे

नागरी समस्यांचे गाऱ्हाणे
Published on

नागरी समस्यांचे गाऱ्हाणे
नवनिर्वाचित सदस्य आयुक्तांच्या भेटीला
वसई, ता. १२ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेत प्रशासकीय राजवटीत अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याने नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी वसई पूर्वेतील प्रलंबित विकासकामांसाठी थेट महापौरांसमोर गाऱ्हाणे मांडले आहे.
गटारे, रस्ते, जलवाहिनी, दिवाबत्ती, साफसफाईसारख्या मूलभूत सुविधांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे त्वरित पूर्ण करणे, झोपडपट्टी व विविध वस्त्यांमध्ये नवीन नळजोडणी सुरू करणे, दिवाबत्ती व इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, पूर्व विभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा व विकासकामांना गती मिळावी, यासाठी तातडीचा निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. या बैठकीत माजी सभापती तथा नगरसेवक कन्हैया भोईर, रमेश घोरकना, सुनील आचोळकर, सदानंद पाटील, अजित भोईर, अस्मिता पाटील, सुनंदा पाटील, निशा भोईर, जयंत बसवंत, अरशद चौधरी, दीपा पाटील, ज्योत्स्ना भगली, लता कांबळे, संतूर यादव, प्रसन्न भातानकर, योगिता पाटील, पंकज पाटील, सचिन देसाई, नीता घरत, प्रदीपिका सिंह यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
-------
अर्थसंकल्पात तरतुदीची मागणी
- पूर्व विभागातील वाढती लोकसंख्या, त्यानुसार वाढणारा महसूल त्या तुलनेत विकासकामांसाठी होत असलेली अपुरी आर्थिक तरतुदीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आगामी अर्थसंकल्पात पूर्व विभागासाठी प्रभाग समितीनिहाय भरीव तरतूद करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
- अधिकाधिक विकासकामे करताना नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून वसई पूर्व विभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतुदीची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. त्याला महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
---------
लोकप्रतिनिधीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येत असून आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून पूर्व विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com