प्रांताधिकाऱ्यांची शाळांना भेट

प्रांताधिकाऱ्यांची शाळांना भेट

Published on

प्रांताधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांस भेट

कासा, ता. १२ (बातमीदार) : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (फेब्रुवारी-मार्च २०२६) मंगळवार (ता. १०) पासून सुरू झाल्या आहेत. अशात डहाणू येथील के. एल. पोंदा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातही बारावीची परीक्षा सुरू असून, येथील परीक्षा केंद्रास प्रांताधिकाऱ्यांनी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रांताधिकारी विशाल खत्री (आएएस) यांनी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या वेळी उप केंद्र संचालक अंबादास चव्हाण व सहकेंद्र संचालक वैभव सुदाम वर्तक उपस्थित होते. या केंद्रावर एकूण ४५२ परीक्षार्थी नोंदणीकृत असून, परीक्षा प्रक्रियेदरम्यान प्रांताधिकाऱ्यांना कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नाही. प्रांताधिकाऱ्यांना भेटीदरम्यान केंद्रावर ५०० प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या होत्या. परीक्षा केंद्रात उपलब्ध वर्गखोल्या परीक्षार्थ्यांच्या संख्येनुसार पुरेशा असून, इमारतीभोवती संरक्षण भिंत व कुंपण असल्याने सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांच्यावतीने सांगण्यात आले. तसेच परीक्षार्थ्यांकडील पुस्तके, वह्या व इतर साहित्य दालनाबाहेर ठेवण्याची व्यवस्था काटेकोरपणे राबविण्यात आली असून, पर्यवेक्षण सूचनांनुसार दक्षतेने केले जात असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.
-------------
कोणताच गैरप्रकार नाही
परीक्षा केंद्राबाहेरील वातावरण शांत होते. पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाहेरील व्यक्तींचा उपद्रव, गैरमार्गासाठी बाह्य मदत, तोतया परीक्षार्थी अथवा कॉपीचा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे.
भौतिक सुविधांच्या दृष्टीने मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, परीक्षार्थ्यांच्या प्रमाणात पुरेशा वर्गखोल्या, सर्व खोल्यांमध्ये पंखे व विद्युत सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले. एकूणच परीक्षा केंद्राची इमारत व व्यवस्थापन योग्य व समाधानकारक असल्याचा निष्कर्ष प्रांताधिकारी विशाल खत्री यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com