हायमास्ट बंदमुळे जगदुशा नगर परिसर असुरक्षित

हायमास्ट बंदमुळे जगदुशा नगर परिसर असुरक्षित

Published on

पथदिवे बंदमुळे जगदुशानगर परिसर असुरक्षित
रात्री दारूच्या पार्ट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) ः जगदुशानगर परिसरात गेल्या महिनाभरापासून पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात आहे. या अंधाराचा गैरफायदा घेत रात्री मैदानात काही लोक दारूचे सेवन करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, परिसरातील वातावरण असुरक्षित बनले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मैदानाचा वापर लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक नियमितपणे करतात. तसेच रात्री अनेक नागरिक चालण्यासाठी येतात; मात्र अंधार व असामाजिक तत्त्वांच्या वावरामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात असुरक्षित वाटत आहे.
वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप पथदिवे सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन ते सुरू करावे, अशी मागणी मनसेचे शाखाध्यक्ष गणेश पवार यांनी केली आहे.
वीज वितरण विभागाच्या गौरी चितळे यांनी सांगितले, की पथदिव्यांसंदर्भात अदाणीकडे फॉलोअप सुरू आहे. अदाणीने आम्हाला न कळवता त्याचे मीटर बंद केले आहेत. आम्ही पथदिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संध्याकाळी लहान मुले खेळण्यासाठी येतात, महिला रात्री चालण्यासाठी परिसरात येतात. गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने काही लोक मैदानात नशा करीत आहेत, त्यामुळे येथे असुरक्षितपणा वाढला आहे, अशी प्रतिक्रिया शाखाध्यक्ष गणेश पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com