फुंडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

फुंडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Published on

फुंडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
उरण, ता. १२ : रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे शाखेत मंगळवारी (ता.३) वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अनिवासी गुरुकुल वर्गातील इयत्ता पाचवी ते नववीतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी, एन.एम.एम.एस. व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेले तसेच तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत गीत व स्वागत गीत सादर करण्यात आले. कु. प्राजक्ता कडू हिने ‘तूज मागतो मी आता’ हे गीत सादर केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘शिवरायांच्या बुद्धीयुक्तीचा’ (७ वी ब) या नृत्याला प्रथम, तर ‘पापलेट वाले रिमिक्स’ (९ वी अ) या नृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला.
सन २०२५-२६ साठी शौर्य राजेश पाटील यास आदर्श विद्यार्थी, तर कु. प्रियंसा रामविलास राजभर हिला आदर्श विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास चेअरमन कृष्णाजी कडू, स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एन. पाटील व डी. जे. सुतार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com