आशा सेविकांचा आक्रोश मोर्चा

आशा सेविकांचा आक्रोश मोर्चा

Published on

आशा सेविकांचा उद्रेक
तीन महिन्यांपासून वेतनाअभावी उपासमार
पालघर, ता. १२ ः जिल्ह्यातील आशा सेविकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आक्रमक झालेल्या हजारो आशा सेविकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आरोग्य विभागात काम करणाऱ्या गटप्रवर्तक आणि आशा सेविकांना ऑक्टोबर २०२५ पासून नियमित मानधन मिळालेले नाही. नेहमीप्रमाणे मानधन रखडले आहे. त्यामुळे या मानधनासह पुढे नियमित मानधन देण्यात येण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. जिल्ह्यात कोविडदरम्यान काम केलेल्याचा प्रोत्साहन भत्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे गटप्रवर्तक आणि आशा सेविकांना २३ महिन्यांचे २३ हजार रुपये देण्याची मागणी आंदोलनातून केली केली. गटप्रवर्तक आणि आशा सेविकांना पूर्वी ऑनलाइनची कामे सांगितली जात नव्हती; मात्र आता ऑनलाइनच्या कामासाठी सक्ती केली जात आहे. तसेच इंग्रजीमधून काम करणे अवघड असल्याने मातृभाषेतून कामाची मुभा मिळावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे.
-------------------------------
आंदोलनाचा इशारा
गटप्रवर्तक व आशा सेविकांकडे सरकारी ऑनलाइनची कामे करण्यासाठी मोबाईल फोन उपलब्ध नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीचा मोबाईल घेऊन द्यावा, ठरवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त कामी सांगू नये, अधिकारीवर्गाकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. आयुष्मान भारत योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साफसफाईची कामे करायला सांगू नये, ग्रामस्वच्छता पाणीपुरवठा समितीवर सचिव म्हणून नियुक्ती देण्यात येऊ नये, अशा मागण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com