अतिक्रमणांवर कारवाई होताच आंदोलनाऐवजी सत्कार सोहळा
अतिक्रमणांवर कारवाई
आंदोलनाऐवजी सत्कार सोहळा
मुंबई, ता. २७ : शिवडी येथील डी.जे. रोडवरील वाढत्या अतिक्रमणांविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने आंदोलनापूर्वीच तत्परता दाखवत धडक कारवाई केल्याने रहिवाशांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांचा जाहीर सत्कार केला.
डी.जे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे बस्तान होते. सोबतच अवैध वाहनतळ, अवैध मासळी बाजार या अतिक्रमणाविरुद्ध शिवडीच्या अकरा इमारतींच्या सोसायट्यांच्या रहिवाशांनी एकत्र येत स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस, आरटीओ आणि महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा निषेध आंदोलन करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला होता. याची दखल घेत संबंधित पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करून डी.जे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आणि रस्ता मोकळा केला. त्यामुळे रहिवाशांनी अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ निरीक्षक विनोद तावडे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सरदार नाळे, पोलिस, महापालिका आणि वाहतूक पोलिसांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छ शिवडी सुंदर शिवडी शिस्तबद्ध शिवडी मोहिमेची सुरुवातही करण्यात आली. यापुढे ही संघटना नोंदणीकृत करून शिवडी सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी कार्यक्रम हाती घेऊ, असे राजन घाग यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

