शीळफाटा येथे तरुणावर चाकू हल्ला प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल,

शीळफाटा येथे तरुणावर चाकू हल्ला प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल,

Published on

तरुणावर चाकू हल्लाप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
कळवा, ता. १० (बातमीदार) ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून शीळफाटा येथील तरुणाला चौघांनी मारहणा करुन जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. रविवार (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हरून उस्मान शेख (वय २१) कामावरून कसवा प्लाझा येथे आपल्या घरी जात असताना आरोपी अख्तर याने हरून याला एम.एस. कंपाउंड महिनुर बिल्डिंग येथे भेटायला बोलवले आणि जुन्या भांडणाचा विषय उकरून पोलिसांत तक्रार केल्याचा जाब विचारला. अख्तरने आपले इतर साथीदार सलमान, समीर, मुसा यांना बोलवून हरून याला मारहाण केली चाकूने जीवघेणा हल्ला केला. याची माहिती मिळताच हरूनचा भाऊ मोहम्मद सोडवायला गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी हरून याला शिळफाटा येथील क्वीन्स रुग्णालयात दाखल केले व तेथून उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार दाखल करून उपचार सुरु केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com