‘टाटा पॉवर’कडून महिला सशक्तीकरणाचा ‘अनोखा धागा’

‘टाटा पॉवर’कडून महिला  सशक्तीकरणाचा ‘अनोखा धागा’
Published on

‘टाटा पॉवर’कडून महिला सशक्तीकरणाचा ‘अनोखा धागा’

मुंबई, ता. १० : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टाटा पॉवरने नुकतेच ‘अनोखा धागा’ या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासाचा गौरव केला. वंचित समुदायातील महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम मावळ येथील एका छोट्या शिवणकाम केंद्रापासून सुरू करण्यात आला.

‘अनोखा धागा’ या उपक्रामाअंतर्गत घराची जबाबदारी सांभाळून आपल्या कष्टाने आणि कौशल्याने या महिला विविध वस्तू बनवतात. या उपक्रमात या महिलांना काम शिकवले जाते आणि वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही पुरवला जातो. यामुळे महिलांना आपल्या घरूनच सहजपणे काम करता येते आणि त्यांना शिकण्यासोबतच उत्पन्नाचे एक भक्कम साधनही मिळते. ते त्यांच्या आर्थिक विकासाचा आधार बनते. सुरुवातीला शिवणकामावर आधारित असलेला हा उपक्रम आता विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. भरतकाम, हस्तकला, चॉकलेट्स आणि कुकीजसारखे खाद्यपदार्थ, घरसजावटीच्या वस्तू तसेच इतर हस्तनिर्मित उत्पादनांमध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाते. डिझाइन, सॅम्पलिंग, उत्पादन, पॅकेजिंग, किंमत निर्धारण आणि बाजारपेठेतील सहभाग अशा संपूर्ण मूल्यसाखळीतील कौशल्ये महिलांना शिकवली जातात. तसेच शिक्षण, आरोग्य गरजा आणि लघुउद्योग विकासासाठी आर्थिक सहाय्य देऊन महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यालाही बळ दिले जाते. या उपक्रमाविषयी माहिती देताना टाटा पॉवरच्या प्रवक्त्याने सांगितले, की टाटा पॉवरचा विश्वास आहे, की महिलांचे सक्षमीकरण केवळ उपजीविका निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही. ‘अनोखा धागा’च्या माध्यमातून आम्ही अशी एक इकोसिस्टीम तयार करीत आहोत जिथे महिला आत्मविश्वास मिळवतात, त्यांचे कौशल्य विकसित करतात आणि सामूहिक प्रगतीच्या माध्यमातून एकमेकींना साथ देतात. त्यांचा हा प्रवास हेच सिद्ध करतो, की कशा प्रकारे योग्य संधी, भागीदारी आणि सतत शिकण्याची जिद्द एक कायमस्वरूपी सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणू शकते.

२०१६मध्ये महाराष्ट्रातील मावळ येथे केवळ १० महिलांसह सुरू झालेला ‘अनोखा धागा’ उपक्रम आज देशभर विस्तारला आहे. सध्या ९ राज्यांमधील २५ केंद्रांच्या माध्यमातून ३०,००० हून अधिक महिलांचे एक मोठे जाळे तयार झाले आहे. हा उपक्रम केवळ महिलांना एकमेकींशी जोडत नाही, तर त्यांच्या लघुउद्योगांना आणि गटांना प्रगतीसाठी मोलाची मदतही करीत असल्याचे कंपनीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com