कल्याणमध्ये रंगणार गुढीपाडव्याची मैफल “धरोहर”

कल्याणमध्ये रंगणार गुढीपाडव्याची मैफल “धरोहर”
Published on

कल्याणमध्ये रंगणार गुढीपाडव्याची सांगीतिक मैफल
सलील आणि शुभंकर कुलकर्णी उलगडणार संगीताचा ‘धरोहर’
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : भारतीय संस्कृती आणि संगीताचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा हस्तांतरित होतो, याचा सुरेल प्रवास कल्याणकरांना अनुभवता येणार आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून ‘धरोहर’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम शुक्रवार, २० मार्च रोजी रात्री ८:४५ वाजता कल्याणच्या अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘धरोहर’ म्हणजे वारसा. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी आणि त्यांचा पुत्र शुभंकर कुलकर्णी यांची ही संकल्पना असून, संगीताचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरामध्ये हा कार्यक्रम पहिल्यांदाच सादर होत असल्याने रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या कार्यक्रमात डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी यांच्यासोबत सुप्रसिद्ध गायिका शरयू दाते आपल्या गायनाने रंगत भरतील, तर लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या प्रभावी निवेदनाने ही मैफल सजणार असून, त्यांना नामवंत वादक साथीदारांची साथ लाभणार आहे.

होरायझन इव्हेंट्सचे आयोजन
‘होरायझन इव्हेंट्स’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीही अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम या संस्थेने कल्याणकरांसाठी सादर केले आहेत. याही कार्यक्रमाला रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, असा विश्वास आयोजक प्रशांत दांडेकर आणि स्वप्नील भाटे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com