

अनियमित गॅस वितरणाने रोष
वाणगावात कष्टकरी संघटनेचा एजन्सीवर मोर्चा
कासा, ता.११ (बातमीदार)ः वाणगाव येथील इंडेन गॅस एजन्सीच्या अनियमित कारभाराच्या निषेधार्थ कष्टकरी संघटनेने बुधवारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गॅस पुरवठ्यातील अनियमितता, ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत संघटनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक वेळा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. तसेच गॅस बुकिंगच्या वेळीच पैसे घेतले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला. याशिवाय गॅस घरपोच किंवा गावपातळीवर पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ग्राहकांना १० ते २० किलोमीटर अंतरावरून वाणगाव येथे जावे लागते. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचाही आरोप संघटनेने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.